Solapur-413006 sachinbiotech999@gmail.com
Follow us:

PLANT GROWTH PROMOTER

...
CHALLENGE


फायदे : एक फुलोत्तेजक आहे. त्यामुळे फुलांचे उत्पादन जास्त होते व त्यामुळे उत्पन्न ३०% पर्यंत वाढते. डोस चॅलेंज १.५-२ मि.लि. प्रति १ लिटर पाणी. कोणत्याही किटकनाशक किंवा बुरशीनाशका सोबत फवारता येते. सोयाबीन, तूर व कापूस या पिकांसाठी अतिउपयुक्त आहे, पेरणीनंतर १५ दिवसानंतर फवारणी सुरू करावी. दर २५ दिवसांच्या अंतराने फवारल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
प्रमाण : डोस चॅलेंज १.५-२ मि.लि. प्रति १ लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :

...
EXPERT


फायदे : १) एक्सपर्ट मुळे फुलांच्या संख्येत वाढ होते. २) एक्सपर्ट च्या वापराने फळाचे आकारमान वाढते. ३) एक्सपर्ट मुळे फळाला आकर्षक रंग येवुन वजन वाढते. एक्सपर्ट प्रतिकुल परिस्थितीत पिकांची सर्वांगीण वाढ करते. ४) एक्सपर्टच्या वापरामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
प्रमाण : ३० मि.ली. प्रति हातपंप ड्रिप मधुन प्रति एकर २ लिटर.
पॅकिंग साइजेस : ५०० मिली, १ लिटर, ५ लिटर, २० लिटर

...
GREEN GOLD


फायदे : १) ग्रीन गोल्ड हे पिकांचा ट्रेस कमी करते. पिकांची प्रतिकारक शक्ती वाढवते तसेच प्रतिकूल वातावरणात पिकांची वाढ होण्यास मदत करते. जमिनीतील नाट्रोजनचे संतुलन ठेवण्यास मदत करते. पिकांची वाढ होण्यास मदत होते.
प्रमाण : २ ते ३ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : ५०० मिली, १ लिटर

...
DOLLAR


फायदे : डॉलर मुळे पिकांची वाढ झापट्याने होते. डॉलर मुळे पिकांचा फुटवा वाढतो. डॉलर पिकांच्या पांढऱ्या मुळाच्या संख्येत लक्षणीय वाढ करते. डॉलर हे सेंद्रिय पीक संवर्धक आहे. याच्या वापराने उत्पादनात २०-४०% वाढ होते. डॉलर पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. डॉलर जमीनीची अन्न, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढवते.
प्रमाण : ३ ते ५ मिली. प्रति १ लिटर पाणी फवारणीद्वारे / २ लिटर प्रति एकर ड्रिपद्वारे
पॅकिंग साइजेस : १ लिटर, ५ लिटर

...
NEEMRAJ 10000


फायदे : निम ऑईल हे एक नैसर्गिक किटकनाशक आहे. निम ऑईल मुळे सर्व प्रकारच्या किटकांना आटकाव होतो. पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते तसेच सहजासहजी पिक कोणत्याही रोगास बळी पडत नाही. आळ्यांचा व माशांचा नाश होतो
प्रमाण : १.५ ते २ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : १००, २५०, ५०० मिली, १ लिटर, ५ लिटर

...
Soil Booster


फायदे : पाणलोट क्षेत्रातील मुळांच्या सभोवतालच्या मातीमध्ये ऑक्सिजन पातळी ५०% नी वाढवते. निरोगी वनस्पती देखभाल आणि संरक्षण करते. ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या अधिक कार्यक्षम हालचाली all Charge करण्यास परवानगी देणारी मातीची हायड्रॉईडिक नाली सुधारण्यास मदत करते. झाडांना अधिक पाणी शोषण्याची क्षमता वाढविते आणि क्षणामध्ये ऑक्सिजन रिलीझ एजंटचा धीमेपणा राखते ठेवते.
प्रमाण : ड्रीप ५० ग्रॅम ३०० लिटर पाणी एकरी + १ लिटर २०० लिटर पाण्यामध्ये
पॅकिंग साइजेस : १००० मिली + ५० ग्रॅम

...
Flower Plus


फायदे : फ्लॉवर प्लस - एक फुलोत्तेजक आहे. त्यामुळे फुलांचे उत्पादन जास्त होते व त्यामुळे उत्पन्न ३०% पर्यंत वाढते. फ्लॉवर प्लस १.५-२ मि.लि. १ लि. पाण्यात टाका हे कोणत्याही किटकनाशक किंवा बुरशीनाशका सोबत फवारता येते. कापूस, सोयाबीन, तूर, मिरची, भेंडी, वांगी आणि नर्सरीतील झाडासाठी अतिउपयुक्त आहे. फळ, दभवर्गीय पिके व तेलवर्गीय पिकांवर पण प्रभावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी फवारणी सुरू करावी दर २५ दिवसांच्या अंतराने फवारल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ होते
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : ५०० मिली, १ लिटर, ५ लिटर

...
Sachin Gluco-Potash


फायदे : ग्लुकॉनेट वर आधारित उत्पादन आहे. हे बायो फर्मेंटेशन (किण्वन) प्रक्रियेवर आधारित तयार केलेला सेंद्रिय पोटॅश प्रॉडक्ट आहे. १०० % पाण्यात विरघळणारा, जैविक स्वरूपाचा व लगेच पिकांमार्फत शोषला जाणारा प्रॉडक्ट आहे. पिकांची वाढ करणारा तसेच फुले व फळे योग्यरित्या विकसित करणारे उत्पादन आहे. पिकांची तसेच पानांची निरोगी वाढ करणारे व फळांमध्ये गोडी विकसित करते. हे फळांचे आकारमान व वजन वाढविते.
प्रमाण : २ मीली प्रति लिटर पाण्यासाठी
पॅकिंग साइजेस : २.५ ते ५ लिटर प्रति एकर

...
PRINCE


फायदे : प्रिन्स हे व्हिटामीन्स, प्रोटीन्स, एन्झाईम्स व अमिनो ऍसीडयुक्त उत्पादन आहे. प्रिन्सच्या वापरामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया वेगाने होऊन पेंशींचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होते. तसेच पानांचा आकार, फांदया व फुलांच्या संख्येत वाढ होते. फळांचे आकारमान चमक वजन व क्वालिटी वाढवते पिकांचे आयुष्य वाढवून उत्पादनात वाढ होते अती व कमी पाऊस तापमान थंड वातावरण यापासून पिकांचे संरक्षण होण्यास मदत करते हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे.
प्रमाण : ०.५ते१ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : २५०, ५०० मिली

...
ROCKET


फायदे : रॉकेट हे पूर्णपणे वनस्पती तेलापासून बनविलेले १००% सुरक्षित माध्यम आहे. रॉकेट इतर किटकनाशकाबरोबर वापरले असता पिकांचे किडीपासून दीर्घकाळ संरक्षण करतो. रॉकेट मिलीबग, पांढरी माशी, लोकरी मावा या सारख्या किडीवर असणारे मेणचट विरघळविण्याचे कार्य करते, रॉकेटसोबत वापरलेले किटकनाशक किडीच्या शरिरात पूर्णपणे शोषले जाते त्यामुळे १००% नियंत्रण मिळते. किटकनाशकाच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
प्रमाण : २ मिली लिटर
पॅकिंग साइजेस : २५० मिली ५०० मिली

...
VIRAT


फायदे : विराटच्या वापरामुळे खोडातील बोअरर बाहेर येऊन मरतो. विराटच्या वापरामुळे झाडाच्या खोडांचे वाळवी पासुन संरक्षण होते. उत्कृष्ट प्रतिबंधात्मक / उपचारात्मक गुणधर्म
प्रमाण : १) २५० मिली विराट १०-१५ पाणी तयार करावे व ते चांगले ढवळून घ्यावे. २) औषधाचा वापर करताना सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात फवारणी घ्यावी. ३) हे औषध फक्त खोड धुण्यासाठी किंवा खोडाच्या बुडात ड्रिचींगसाठी वापर करावा. ४) औषधाची फवारणी घेताना तोंड बांधून घेणे व डोळ्याची काळजी घेणे. २.५ मिली प्रति लिटर.
पॅकिंग साइजेस : २५०, ५०० मिली

...
STICK SB


फायदे : स्टीक एस. बी. हे पानांवर एकसारखे पसरते. पाण्याच्या द्रव्यकणाला व किटकनाशकाला पानावर जास्त काळ टिकवून ठेवते. त्यामुळे फवारणीनंतर पिकांवरुन पाण्याचे थेंब ओघळून जात नाहीत. औषधांची बचत होऊन परिणामकारता वाढते. कोणत्याही किटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके व पोषकांसोबत वापरता येते.
प्रमाण : १० मिली प्रति १५ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : १००, २५०, ५०० मिली १ लि., ५ लि.

...
SACHIN ZYME


फायदे : सचिन झाईम हे वनस्पतींचे रोगांपासून संरक्षण करण्याचे काम करते. पिकांना आवश्यक असणारे हार्मोन्स व ऑक्सिजनची कमरता भरुन काढण्याचे काम करते. तसेच जैविक व रासायनिक क्रिया गतीमान करते. त्यामुळे पिक चांगले येते. व उत्पादनात भरघोस वाढ होते.
प्रमाण : - २०० मिली प्रति एकर
पॅकिंग साइजेस : २५०, ५०० मिली, १ लिटर

...
BOOSTER


फायदे : बुस्टरचा उपयोग पिकांच्या पांढऱ्या मुळ्या BOOSTER वाढसाठी केला जातो. पांढऱ्यामुळ्यांची संख्या वाढल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. ह्युमिक ऍसिड ६०%
प्रमाण : बुस्टरचा उपयोग पिकांच्या पांढऱ्या मुळ्या BOOSTER वाढसाठी केला जातो. २ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासोबत किंवा ५०० ग्रॅम प्रति एकर
पॅकिंग साइजेस : २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १००० ग्रॅम

...
AMINO STAR


फायदे : अमिनोस्टार पिकांचे पोषणमूल्ये वाढविते. अमिनोस्टार मुळे हरीतद्रव्य निर्मितीस चालना मिळते. परागीभवन निर्मिती व प्रकाश संश्लेषण क्रिया सुरळित करते. पेशींची निर्मिती झपाट्याने होते. त्यामुळे शाखीय वाढ जोमाने होते. फुले व फळांची निर्मिती भरपूर प्रमाणात होते. तसेच पिकातील प्रतिकार शक्तीही वाढते. अमीनो ऍसिड - 80%
प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम

...
Sachin CaMgB


फायदे : हे १०० % पाण्यात विरघळणारा, जैविक स्वरूपाचा व लगेच पिकांमार्फत शोषला जाणारा प्रॉडक्ट आहे. हे पिकांच्या हिरव्या पानांना प्रोत्साहित करून क्लोरोसिस ची तीव्रता कमी करते. हे प्रकाश संश्लेषणात मदत करून कर्बोदके, ऑइल फॅट व प्रथिने यांना प्रोत्साहित करते. प्रथिनेच्या निर्मितीसाठी सुधारणा करते. CaMg B पेशीभित्तिका सुधारते तसेच फुलोरा व पेशी विभाजना मध्ये मदत करते. द्राक्षा मधील सुकवा व मम्मीफिकेशन कमी करण्यास मदत होते फळांमध्ये गोडवा निर्माण करते
प्रमाण : दोन मिलिलीटर पाण्यासाठी ड्रीप साठी दोन पॉईंट पाच ते पाच लिटर प्रति एकर
पॅकिंग साइजेस : 500 मिली एक लिटर

...
Extra Longer


फायदे : हे द्राक्षांना लंबगोलाकार करण्यास मदत करते. हे द्राक्षांचे आकारमान वाढविते. हे द्राक्षांमध्ये गोडवा निर्माण करते. हे द्राक्षांना योग्यत्या व सर्वोत्तम आकारमानास घेऊन जाते. हे माणिकचमन, सोनाका, सुपरसोनाका, सरिता आणि यासारख्या लंबगोलाकार द्राक्षांच्या जातीमध्ये वापरणे फार फायदेशीर आहे.
प्रमाण : 1) 50% फ्लॉवरिंग स्टेज - 100 ते 125 एमएल/एकर २) फळ विकास टप्पा-२५० एमएल ते ७५० एमएल/एकर
पॅकिंग साइजेस : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर

...
Champion Gel


फायदे : हे जेल तत्रज्ञानावर आधारित शेतीपूरक उत्तम उत्पादन आहे. यामध्ये सूक्ष्मकण असलेले घटक आहेत. हे पेशी विभाजनास सहाय्य करते. हे पांढऱ्या मुळांच्या वाढीस व विकासास मदत करते. हे फुलोरा, फळ सेटींग व फळांच्या विकासामध्ये चॅम्पियन सुधारणा करते.
प्रमाण : भाजीपाला पिके-100 ग्रॅम/एकर 2) फळ पिके-250 ग्रॅम/एकर ठिबक/मातीचा डोस भाजीपाला पिके - 250 ग्रॅम/एकर 2) फळ पिके-500 ग्रॅम/एकर
पॅकिंग साइजेस : ५० मिली, १०० मिली, २५० मिली, ५०० मिली

...
Chetak


फायदे : हे एक फुलोतेजक व फळ सुधारणा करणारे पीकवर्धक उत्पादन आहे. हे पिकांच्या शाकीय वाढीस व प्रकाश CRBT संश्लेषणास मदत करते. हे फुलोरा व फळ यामध्ये सुधारणा करते. हे पिकांना रोगाशी लढण्याची क्षमता निर्माण करते. हे फळांचे आकारमान, रंग, साखर यामध्ये सुधा रणा करते. द्राक्षामध्ये याचा वापर फायदेशीर ठरतो.
प्रमाण : द्राक्ष पिकासाठी घड जिरू नये म्हणून ५० मिली /एकर. पाकळ्यातील अंतर वाढीसाठी १०० मिली / एकर. Foliar Spray Dose 1) VEGETABLE CROPS-50 ML/ACRE 2) FRUIT CROPS-100 ML/ACRE
पॅकिंग साइजेस : ५० मिली, १०० मिली, २५० मिली, ५०० मिली

...
SILICON 95


फायदे : सिलीकॉन ९५ हे पिकांच्या पेशींच्या पृष्ठभागावर टणक थर निर्माण करते. त्यामुळे पिकास हानीकारक असणाऱ्या किडीना रस शोषणापासून थांबविते. त्यामुळे किडी पिकास हानी पोहचवू शकत नाहीत. पिकांचा त्यापासून बचाव होतो. तसेच सिलिकॉन ९५ मुळे साल मजबूत होते. फळांमधील Saran Rapid Palechen पाण्याचे संतुलन राखले जाते. प्रकाश संश्लेषण क्रिया परिणामकारक घडते. त्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया जोमाने चालते परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
प्रमाण : १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम

...
FULVICO


फायदे : फुलविको वनस्पतींना पोषक द्रवपदार्थ व अघुलनशील पोषक द्रव्यांचे रोपांना Fulvico उपलब्ध असलेल्या स्वरुपांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहित करतो. फुलविको रुट झोनमध्ये पाण्यात विरघळणारी खते टिकवून ठेवतात आणि आवश्यकतेनुसार ते झाडांमध्ये सोडतात. फुलविको बियाण्यांच्या लवकर उगवणांना आणि वेगवान मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
प्रमाण : १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (ड्रिप / ड्रेचींन/स्पे)
पॅकिंग साइजेस : २५० मिली ५०० मिली

...
CYTOZYME


फायदे : सायटोझाइम एक सेंद्रीय खत आहे. ज्यामध्ये सायटोकिन्स जास्त प्रमाणात असतात. सायटोझाइम पेशी विभागणी, मुलभूत अंकूर निर्मिती, फुलांच्या फळांच्या सेटिंगसाठी प्रोत्साहित करण्यास मदत करते. हे झाडे हिरवीगार राहण्यास व वृध्दत्व टाळण्यास मदत करते
प्रमाण : १० मिली / २०० लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस : ०२ मिली, १० मिली

...
ROOT PLUS


फायदे : 1. पांढऱ्या मुळांची जोमाने वाढ होते. जैविक शक्तीची वाढ करते व मुलद्रव्य शोषून घेण्यास मदत करते. 2. पेशी विभाजनाचा वेग वाढवते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाल्याने चांगले उत्पन्न मिळते. 3. पिकांची जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची शक्ती वाढवते. मुळांची शोषन क्रिया सुधारते.
प्रमाण : १ ते २ लिटर प्रति एकर
पॅकिंग साइजेस : १ लि., ५ लि.