Solapur-413006 sachinbiotech999@gmail.com
Follow us:

GRANULATED FERTILIZERS

...
MAGIC (GRANULE/POWDER)


फायदे : मॅजिक हे दुय्यम पोषक तत्व आहे. जे प्रकाश संश्लेषणात महत्त्वपुर्ण भुमिका बजावते. मॅजिक हे वनस्पती निरोगी, ग्रीन ठेवते आणि अधिक उत्पादन होण्यास मदत करते.
प्रमाण : १०० किलो प्रति एकरी
पॅकिंग साइजेस : 5० किलो मध्ये
घटक : Calcium Sulphate Dihydrate - 70 % Sulphur as S - 13 % Sodium as Na - 0.75 %

...
SUPER SILICON (GRANULE/POWDER)


फायदे : सिलीकॉन दाणेदार च्या वापरामुळे रोगकारक बुरशी व रसशोषक कीडींना मोठ्या प्रमाणात अटकाव केला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होऊन पिकातील अन्नासाठा वाढविण्यास मदत होते. पिकांवर फवारल्यामुळे काळोखी व चमक येते. पर्णरंध्राद्वारे होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन अतियश कमी केले जाते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होते. सिलीकॉन दाणेदारच्या वापरामुळे पालाश, स्फुरद मोठ्या प्रमाणात मिळते. फळांचा व भाजीपाल्याचा पिक काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढू शकतो. फळकुज मुळे होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी करता येते. फळकुज रोगास मोठ्या प्रमाणावर अटकाव करते.
प्रमाण : १०० किलो प्रति एकर
पॅकिंग साइजेस : ५० किलो मध्ये उपलब्ध.
घटक : Plant Available Silicon ( Si (OH)4 ) - 0.08 % pH Minimum = 7.5

...
BALWAN (Ca : Mg : S - 6 : 2 : 4 )


फायदे : बलवान हे एक कॅल्शियम (६%) मॅग्नेशियम ( २%) व सल्फर (४%) वर आधारित जमिनीतून द्यावयाचे दुय्यम अन्नद्रव्य युक्त खत आहे. बलवान खतामुळे शेतजमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा सामू नियंत्रित करण्यास मदत होते. बलवानच्या वापरामुळे पिकांच्या मुळांची वाढ व पेशी विभाजन योग्य होते व अन्नद्रव्ये ग्रहण करण्यास पिकांना मदत होते. बलवान च्या वापरामुळे ऊस पिकांचे लोळण्याचे प्रमाण कमी होऊन पिकामध्ये अधिक अन्नद्रव्यांची निर्मिती होऊन ऊस पिकांचे उत्पादन तर वाढतेच पण त्यासोबत उसामध्ये कीड व रोगाशी लढण्याची प्रतिकार क्षमता निर्माण होते.
प्रमाण : १०० किलो प्रति एकर
पॅकिंग साइजेस : ५० किलो मध्ये उपलब्ध.
घटक : Calcium as Ca - 6 % Magnesium as Mg - 2 % Sulphur as S - 4 %

...
BLACK DIAMOND


फायदे : ब्लॅक डायमंडचा उपयोग भुसुसाधरक म्हणून होतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हे पिकांना जैवरासायनिक घटक पुरविते सुक्ष्म जीवांच्या संख्येत वाढ होते. पेशी विभाजनाचा वेग वाढविते. वनस्पतींच्या सर्व अवयवांची वाढ घडविते. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते. पिकांची जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची शक्ती वाढते. पिकांतील पिवळेपणा कमी होतो. प्रकाश संश्लेषण व मुळांची श्वसन क्रिया सुधारते.
प्रमाण : २५ किलो प्रति एकर
पॅकिंग साइजेस : २५ व १० किलो मध्ये उपलब्ध.
घटक : Humic Acid - 12 % Amino Acid - 3 % Fulvic Acid - 3 % Bentonite Granules - 82 %